Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (५ ऑक्टोबर) १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २५५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १२१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (५ ऑक्टोबर) १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २५५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २० मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेलमधील ३, नवीन पनवेलमधील ४, खांदा कॉलनीतील २, कळंबोली येथील ३, कामोठ्यातील ३, खारघर येथील ४ आणि तळोजा येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ११, नवीन पनवेल ९, खांदा काॅलनी ७, कळंबोली २५, कामोठे २७, खारघर ३७, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३३,   नवीन पनवेल ४८, कळंबोली २५, कामोठे ५२, खारघर ९१,  तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.  

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २०२६७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १८०४७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १७४८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यास…

Coronavirus Updates: कोरोनाच्या उपाययोजनांवरील खर्चात ५० टक्के कपात करण्याच्या सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा