Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १२६ नवीन कोरोना रुग्ण

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २१७३६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १९६३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १२६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१३ ऑक्टोबर) १२६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १५४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर खारघर येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १९, नवीन पनवेल ९, खांदा काॅलनी २३, कळंबोली १४, कामोठे ३५, खारघर ३२, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ११, नवीन पनवेल २८, कळंबोली २३, कामोठे ५९, खारघर ३०  तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.   

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २१७३६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १९६३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १६०२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा