Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १२८ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (४ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १२८ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १२८ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (४ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १२८ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४५,०३१ झाली आहे. 

बुधवारी बेलापूर ३०, नेरुळ २६, वाशी १०, तुर्भे १५, कोपरखैरणे ८, घणसोली १६, ऐरोली २०, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर २७, नेरुळ ३५, वाशी ३५, तुर्भे १२, कोपरखैरणे २०, घणसोली १६, ऐरोली ९, दिघामध्ये ९ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२,५३१ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९१३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १५८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.




हेही वाचा-

 मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण 

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची भेट, 'इतका' वाढीव मोबदला मिळणार 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा