Advertisement

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची भेट, 'इतका' वाढीव मोबदला मिळणार

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची भेट, 'इतका' वाढीव मोबदला मिळणार
SHARES

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. आशा स्वयंसेविकांना २ हजार आणि ३ हजार रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  त्यामुळे दिवाळी सणापूर्वी राज्यातील ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २ हजार आणि ३ हजार रुपयेइतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. 



हेही वाचा -

Coronavirus Updates लस चाचणीसाठी स्वयंसेवकांची गरज

Matheran Mini Train अखेर माथेरानची मिनी ट्रेन रुळावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा