Advertisement

Matheran mini train अखेर माथेरानची मिनी ट्रेन रुळावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ७ महिन्यांपासून बंद असलेली माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

Matheran mini train अखेर माथेरानची मिनी ट्रेन रुळावर
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मागील ७ महिन्यांपासून बंद असलेली माथेरान मिनी ट्रेन (matheran mini train) सुरू करण्यात आली आहे. पर्यटक व स्थानिकांसाठी आकर्षित करणारी मिनी ट्रेन बुधवारपासून रुळावर आल्यानं अनेकांना दिलासा मिळाला आहे. २ सप्टेंबरपासून माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. सुरुवातीला माथेरानमध्ये पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र हळू हळू तेथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत गेले.

रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मध्य रेल्वेनं ४ नोव्हेंबरपासून प्रथम अमन लॉज ते माथेरान दरम्यान ४ शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांसाठी माथेरान खुले झाल्यानंतर मिनी ट्रेन (mini train) चालवण्याची मागणी वाढू लागली. राज्य सरकारनेही मिनी ट्रेनच्या शटल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मंगळवारी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली.

दस्तुरी या ठिकाणापासून ते माथेरान बाजारपेठेपर्यंतचे २ किलोमीटरचे अंतर पार करेपर्यंत पर्यटकांसह स्थानिकांचीही दमछाक होत होती. मिनी ट्रेनच्या ४ फेऱ्या होणार असून, द्वितीय श्रेणीचे ३ डबे, प्रथम श्रेणीचा एक आणि सामानाकरिता २ बोगी जोडलेल्या असतील.

शटल सेवेच्या वेळा

  • माथेरान ते अमन लॉज : स. ९.३० वा.
  • अमन लॉज ते माथेरान : स. ९.५५ वा.
  • माथेरान ते अमन लॉज : सं. ४.०० वा.
  • अमन लॉज ते माथेरान : सं. ४.२५ वा.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा