Advertisement

मुंबईत १३७ इमारती प्रतिबंधित

मुंबईत सध्या इमारतीत नवीन रुग्ण अधिक आढळत आहेत. त्या तुलनेत झोपडपट्ट्या व चाळीतील रुग्णांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे.

मुंबईत १३७ इमारती प्रतिबंधित
SHARES

मुंबईत रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यामळे अनेक इमारती मुंबई महापालिकेने प्रतिबंधित केल्या आहेत. मुंबईत सध्या १३७ इमारती प्रतिबंधित आहेत. तर केवळ १० झोपडपट्या प्रतिबंधित आहेत. मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या मात्र घटलेली दिसते.  

मुंबईत सध्या इमारतीत नवीन रुग्ण अधिक आढळत आहेत. त्या तुलनेत झोपडपट्ट्या व चाळीतील रुग्णांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे. झोपडपट्या किंवा बैठ्या चाळी या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात लोकसंख्या अधिक असते. मात्र इमारतीत लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे तिथे प्रतिबंधित भागात राहणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्याही इमारतीतील रहिवाशांच्या तुलनेत घटली आहे.

एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे. सध्या अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक म्हणजेच १९ प्रतिबंधित इमारती आहेत. तर चेंबूरमध्ये १८, भांडुपमध्ये १६, वांद्रे पश्चिममध्ये १२, लालबाग परळमध्ये १२ इमारती प्रतिबंधित आहेत. तर मुंबईत बहुतांशी भागात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. तर फक्त भांडुपमध्येच ६ क्षेत्रे प्रतिबंधित आहेत. त्याखालोखाल कुर्लामध्ये २, वांद्रेमध्ये १ व लालबाग परळमध्ये १ प्रतिबंधित क्षेत्र आहे.

मुंबईत १८६३ ठिकाणी मजले प्रतिबंधित आहेत. त्यात सर्वाधिक संख्या अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ग्रॅण्ट रोड, मालाड, मुलुंड, चेंबूर, गोरेगाव, कांदिवली या भागांत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा