Advertisement

मुंबईत १४ हजार कोरोना संशयितांच्या तपासण्या

मुंबई महापालिका रुग्णालयातील 5 आणि 8 खासगी प्रयोगशाळांमध्ये १४ हजार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत १४ हजार कोरोना संशयितांच्या तपासण्या
SHARES

मुंबई महापालिका रुग्णालयातील 5 आणि 8 खासगी प्रयोगशाळांमध्ये १४ हजार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 9 हजार चाचण्या मागील 7 दिवसांत केल्या आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

 कोरोनाची वैद्यकीय तपासणी, चाचणी आणि उपचाराची सुविधा केवळ पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत तपासणीची सुविधा पालिकेच्या 5 तर 8 खासगी प्रयोगशाळांमध्ये सुरू करण्यात आली.पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन करोनाची लक्षणे आढळणाऱ्यांचा शोध घेत आहेत. लक्षणे आढळताच संबंधित व्यक्तीची करोनाविषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये १४ हजार करोना संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्यामुळे करोनाबाधित रुग्ण निदर्शनास येत  आहेत. विलगीकरणासाठी पालिकेने हॉटेल, धर्मशाळा, लॉज आदींमधील तब्बल ११ हजार ३०० खोल्या ताब्यात घेतला आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याखालोखाल केरळ (११ हजार २३२ जणांच्या चाचण्या), दिल्ली (आठ हजार ४६४), कर्नाटक (सहा हजार ५८०) आणि तमिळनाडू (पाच हजार ३०५) यांचा क्रमांक लागतो.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील परिचारिका वसतीगृह बंद

जागतिक हवाई वाहतुकीत ६६.८ टक्के घट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा