Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये १४५ नवे कोरोना रुग्ण, तर ५ जणांचा मृत्यू

आतापर्यंत मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ७९८३ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत २६६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये १४५ नवे कोरोना रुग्ण, तर ५ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका हद्दीत बुधवारी १४५ नवे कोरोनाबाधित (COVID-19) रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात ५ जणांचा मृत्यू देखील झाला आहे.  

आतापर्यंत मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ७९८३ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत २६६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर बुधवारी दिवसभरात २२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी देखील गेले आहेत. शिवाय आतापर्यंत ६०९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

हेही वाचा- अवाजवी बिल आकारलं, मिरा रोडमधील 'ह्या' हॉस्पिटलची कोव्हिड मान्यता रद्द

कोरोनाबाधित रुग्णांवर सरकारी रुग्णालयांत योग्य उपचार सुरू असले, तरी खासगी रुग्णालयात मात्र मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे. कोरोना रुग्णांकडून अनेक रुग्णालयं अवाजवी बील आकारत असल्याचं समोर आलं आहे. मिरा भाईंदर महापालिकेने अशा एका रुग्णालयाला दणका दिला आहे. मिरा रोड येथील गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने रद्द केली आहे.

गॅलेक्सी रुग्णालयाने अधिक बील आकारल्याच्या तक्रारी रुग्णांनी पालिकेकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मिरा भाईंदर महापालिकेने गॅलेक्सी रुग्णालयाची कोविड रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. कोरोना रुग्णांकडून ज्यादा आकारणी केलेली रक्कम रुग्णालयाकडून वसूल करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा