Advertisement

पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी १४६ नवे रुग्ण

दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी पालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी १४६ नवे रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत सोमवारी कोरोनाचे १४६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३९८० वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी पालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंतचा मृतांचा आकडा ९६  आहे.

नव्या रुग्णांपैकी पनवेलमधील ३८, नवीन पनवेलमधील २८, कळंबोलीतील २२, कामोठे २२, खारघरमधील २३, तळोजा १३ रूग्णांचा समावेश आहे. सोमवारी १८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल ७०, नवीन पनवेल १९, कळंबोली १८, कामोठे ३९, खारघर ३३, तळोजातील २ रुग्णांचा समावेश आहे. पनवेल पालिका क्षेत्रात आतापर्यंत २४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. महानगरपालिकेने घोषित केलेला कडक लॉकडाउन रुग्णसंख्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका  लाॅकडाउन २४ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा -

Sealed Building List Mumbai : मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा