Advertisement

पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी आढळले १४८ नवीन रुग्ण

पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे १४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी आढळले १४८ नवीन रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे १४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२५० वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १२७ वर गेला आहे. 

बुधवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेलमधील २६, नवीन पनवेलमधील ३०, खांदा काॅलनी ६,  कळंबोलीतील २३, कामोठे ३०, खारघरमधील २६ आणि तळोजामधील ७ रूग्णांचा समावेश आहे. पालिका क्षेत्रातील तळोजा आणि नवीन पनवेलमधील प्रत्येकी एक आणि पनवेलमधील ३ अशा ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बुधवारी १९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील ५६, नवीन पनवेलमधील १५, कळंबोलीतील ३२, कामोठे ३७, खारघरमधील ३७ आणि तळोजामधील २१ रूग्णांचा समावेश आहे. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ३७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १३७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा - 

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा