Advertisement

राज्यात सोमवारी कोरोनाचे १५ हजार नवे रुग्ण

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. मे महिन्याच्या मध्यावर तर दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांपेक्षा जास्त होती.

राज्यात सोमवारी कोरोनाचे १५ हजार नवे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घटत चालली आहे. सोमवारी राज्यात १५ हजार ७७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच ३३ हजार रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. मे महिन्याच्या मध्यावर तर  दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांपेक्षा जास्त होती. मात्र, त्यानंतर लागू केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम दिसून आला. रुग्णसंख्या घटण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही मोठं आहे. रोज जेवढे रुग्ण आढळत आहेत त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. 

मुंबईकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत (mumbai) ६७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल ५५७० रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या ६६६७९६ आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण २२३९० आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४३३ दिवसांवर गेला आहे. कोविड वाढीचा दर २४ मे ते ३० मे या कालावधीत ०.१५ टक्के राहिला आहे. 

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८ टक्के  झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील लॉकडाऊन आता १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५७ लाख ४६ हजार ८९२ झाली आहे. तर सध्या २ लाख ५३ हजार ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

  • मुंबई मनपा ६६६
  • ठाणे १५५
  • ठाणे मनपा ११५
  • नवी मुंबई मनपा ५८
  • कल्याण डोंबवली मनपा ११४
  • उल्हासनगर मनपा १८
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ९७
  • पालघर १८२
  • वसईविरार मनपा १२६
  • रायगड ३२६
  • पनवेल मनपा ९१
  • ठाणे मंडळ एकूण १९५२
  • नाशिक १७००
  • नाशिक मनपा ३५८
  • मालेगाव मनपा ९
  • अहमदनगर ७९२
  • अहमदनगर मनपा ४२
  • धुळे ४९
  • धुळे मनपा १५
  • जळगाव ९८
  • जळगाव मनपा ३४
  • नंदूरबार २७
  • नाशिक मंडळ एकूण ३१२४
  • पुणे ६२१
  • पुणे मनपा १९४
  • पिंपरी चिंचवड मनपा २३०
  • सोलापूर ४३६
  • सोलापूर मनपा २८
  • सातारा १७१३
  • पुणे मंडळ एकूण ३२२२
  • कोल्हापूर १४४२
  • कोल्हापूर मनपा ३९६
  • सांगली ७४१
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०३
  • सिंधुदुर्ग ५९०
  • रत्नागिरी ५५७
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३८२९
  • औरंगाबाद १३७
  • औरंगाबाद मनपा ८७
  • जालना ५७
  • हिंगोली ४९
  • परभणी ४३
  • परभणी मनपा १२
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३८५
  • लातूर ६९
  • लातूर मनपा २३
  • उस्मानाबाद ३३३
  • बीड ४९४
  • नांदेड ३८
  • नांदेड मनपा ९
  • लातूर मंडळ एकूण ९६६
  • अकोला ८३
  • अकोला मनपा ७७
  • अमरावती २१८
  • अमरावती मनपा ८०
  • यवतमाळ २१२
  • बुलढाणा ३९
  • वाशिम १६४
  • अकोला मंडळ एकूण ८७३
  • नागपूर ११०
  • नागपूर मनपा १९८
  • वर्धा ४०
  • भंडारा ८३
  • गोंदिया ४७
  • चंद्रपूर १२७
  • चंद्रपूर मनपा ४२
  • गडचिरोली ७९
  • नागपूर एकूण ७२६


हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा