Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १६६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (३ ऑगस्ट) १६६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी १६६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (३ ऑगस्ट) १६६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.  

नवीन रूग्णांमध्ये  कामोठ्यातील ४४, कळंबोली-रोडपाली येथील एकूण ३४, खांदा कॉलनीतील २३, खारघरमधील २१, पनवेलमधील १९, नवीन पनवेलमधील ११, घोट येथील ३, तळोजा वसाहतीमधील २, खुटारी येथील २, तसेच आसुडगाव, टेंभोडे, नावडे, खिडूकपाडा, देवीचा पाडा, पेठाली, तळोजा एमआयडीसी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ७०७६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ५५०७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १७० जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३९९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा - 
संबंधित विषय