Advertisement

ठाण्यातील १७ रुग्णालयांना नोटीस, कोरोना रूग्णांकडून १.८२ कोटी अधिक आकारले

रुग्णांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी १७ रुग्णालयांच्या बिलांची तपासणी केली. यानंतर लेखा परीक्षकांची एक टीम नियुक्त केली.

ठाण्यातील १७ रुग्णालयांना नोटीस, कोरोना रूग्णांकडून १.८२ कोटी अधिक आकारले
SHARES

कोरोना संकट काळात अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लुटमार सुरू केली आहे. ठाण्यातील १७ खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून तब्बल १ कोटी ८२ लाख रुपये अधिक वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. यामधील १ कोटी ४० लाख रुपये या रुग्णालयांनी अद्यापही रुग्णांना परत केलेले नाहीत. 

रुग्णांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी १७ रुग्णालयांच्या बिलांची तपासणी केली. यानंतर लेखा परीक्षकांची एक टीम नियुक्त केली. या टीमने १० जुलै ते २१ ऑगस्टपर्यंतच्या बिलांची तपासणी केली. यामध्ये १३६२ बिलांमध्ये  १ कोटी ८२ लाख रुपये अधिक आकारल्याचं दिसून आलं.

ठाणे महानगर पालिकेने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यानंतर रुग्णालयांनी २६.६८ लाख रुपये रुग्णांना परत केले. मात्र रुग्णालयांनी अद्यापही १ कोटी ४० लाख रुपये परत करणे बाकी आहे. कोरोना रुग्णांकडून अधिक शुल्क आकारल्यामुळे गेल्या महिन्यात पालिकेने घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात केला होता. 



हेही वाचा - 

गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही  

लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा