Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १८६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (६ ऑक्टोबर) १८६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २०२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी १८६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (६ ऑक्टोबर) १८६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २०२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील २ आणि खांदा कॉलनी येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १३, नवीन पनवेल २५, खांदा काॅलनी ७, कळंबोली ३०, कामोठे ६९, खारघर ३८, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ३३,   नवीन पनवेल ४५, कळंबोली २७, कामोठे ५१, खारघर ४२,  तळोजा येथील ४  रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २०४५३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १८२४९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४७५ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १७२९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यास…

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा