Advertisement

महाराष्ट्रात लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा, मात्र लसींचा पुरेसा साठा कधी?

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी २ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरलं आहे.

महाराष्ट्रात लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा, मात्र लसींचा पुरेसा साठा कधी?
SHARES

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी २ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरलं आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं कौतुक केलं आहे.

तर, दुसरीकडे लसींच्या पुरेशा साठ्याअभावी अजूनही मोठ्या प्रमाणात लोकं लस मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत. राज्यातील लसीचा तुटवडा संपून लसीकरण कधी मार्गी लागणार याची सर्वजण वाट बघत आहेत.

सोमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचं लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्र (maharashtra) सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा- Cyclone Tauktae: बीकेसी जम्बो कोविड सेंटरचं मोठं नुकसान नाही

दरम्यान, गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लसींच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षांपुढील लाखो नागरिकांना पात्र असूनही लसीचा दुसरा डोस मिळत नसल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही सर्वत्र लस मिळत नसल्याने त्यांच्यातही संताप आहे. परिणामी लसीकरणावरून (covid 19 vaccination) राज्यभरात आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये खटके उडत आहेत. या सर्व परिस्थितीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार असल्याचं म्हणत आहे. परंतु अद्याप त्यासंदर्भात कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने (bmc) काढलेल्या ग्लोबल टेंडरला देखील प्रतिसाद मिळत नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्यात पुरेश्या प्रमाणात लसीचा साठा केव्हा उपलब्ध होणार, याकडेच सर्वसामान्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

(2 crore covid 19 vaccination cross in maharashtra)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा