Advertisement

MBBS च्या २ हजार जागा वाढणार- गिरीश महाजन

येत्या वर्षभरात राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमां (MBBS) च्या २ हजार जागा वाढवून मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.

MBBS च्या २ हजार जागा वाढणार- गिरीश महाजन
SHARES

येत्या वर्षभरात राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमां (MBBS) च्या २ हजार जागा वाढवून मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला. सोबतच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

विद्यार्थ्यांचं नुकसान

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.तसंच पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षणाचा कायदा करण्यात सरकार अपयशी झाल्याने मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आ. हेमंत टकले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत केला. 

लवकरच निकाल

त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले, आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं हे पहिलंच वर्ष होतं. त्यामुळे अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आल्या. हे मान्य करावं लागेल. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या वर्षी आरक्षणानुसार प्रवेश मिळावा, यासाठी राज्य सरकारने न्यायालयात ताकदीने बाजू मांडली. येत्या सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाकडून यावर शेवटचा निर्णय येण्याची शक्यता आहे. हा निर्णय सकारात्मक असेल, अशी अपेक्षा आहे.

मागणी पूर्ण

तसंच राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचा जागा वाढविण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात एमबीबीएसच्या २ हजार जागा वाढतील, असंही महाजन म्हणाले.

शनिवार १५ जून राेजी महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी एमबीबीएस, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणे, ७ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे इ. प्रस्ताव त्यांच्यापुढं ठेवले होते. या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली होती.



हेही वाचा-

अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश, सरकारने घेतला जागावाढीचा निर्णय

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्वदीपार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा