Advertisement

ठाण्यात महिन्यात वाढले २० हजार नवे रुग्ण

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी महिनाभरातच २५४ वरून ५० दिवसांवर आला आहे.

ठाण्यात महिन्यात वाढले २० हजार नवे रुग्ण
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील एका महिन्यात पालिका क्षेत्रात तब्बल २० हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.  तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दहा टक्के घट झाली आहे. 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी महिनाभरातच २५४ वरून ५० दिवसांवर आला आहे. सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १५८० नवीन रूग्ण आढळून आले. तर ५ रूग्णांचा मृत्यू झाला. येथील सक्रीय रूग्ण संख्या १२ हजार ३१४ झाली आहे.

महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ८३ हजार ८२६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० हजार ६१८ (८४.२४) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्य:स्थितीत शहरात ११ हजार ८०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ हजार ४०५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

शहरात महिनाभरापूर्वी म्हणजेच ७ मार्चपर्यंत ६३ हजार ६८१ रुग्ण होेते. त्यापैकी ६० हजार ३९४ (९४.८४) रुग्ण बरे झाले आहेत. तर केवळ १ हजार ३३९ सक्रिय रुग्ण होते. मात्र, गेल्या महिनाभरात शहरामध्ये २० हजार १४५ नवीन रुग्ण आढळून आले आहे. यापैकी ११ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दहा टक्क्य़ांनी घट झाली आहे.

महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी पाचशे दिवसांच्या पुढे गेला होता. मात्र, फेब्रुवारी महिनाअखेर रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ७ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी २५४ दिवस होता. तर, १४ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी १८३ दिवसांवर आला होता. त्यामध्ये आता आणखी घट झाली असून तो आता ५० दिवसांवर आला आहे.



हेही वाचा -

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

महापालिका कार्यालयांत आरटीपीसीआर चाचणीशिवाय नागरिकांना प्रवेश बंदी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा