Advertisement

राज्यात नवीन रुग्णांसह मृत्यूंची संख्याही घटली

राज्यात आतापर्यंत ९२ हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे.

राज्यात नवीन रुग्णांसह मृत्यूंची संख्याही घटली
SHARES

राज्यात गुरूवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या घटण्याबरोबरच मृतांचा (death)  आकडाही कमी झाला आहे. राज्यात २१ हजार २७३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मागील दोन महिन्यांपासून राज्यात दिवसाला ५० ते ६० हजार नवीन रुग्ण आढळत होते. तर ८०० ते ९०० रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र आता रुग्णसंख्या कमी होण्यासह मृत्यूही घटले आहेत. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत  ९२ हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९३.०२ टक्के आहे. सध्या राज्यात ३ लाख १ हजार ०४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबईत (mumbai) गुरूवारी १२६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. तसंच ८५५ रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार ३१० आहे. तर रिकव्हरी रेट ९४ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४०,८६,११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,७२,१८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,१८,२७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १९,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

 १        मुंबई महानगरपालिका   १२५८

२        ठाणे     २०६

३        ठाणे मनपा       १५८

४        नवी मुंबई मनपा १०५

५        कल्याण डोंबवली मनपा          २०५

६        उल्हासनगर मनपा        ५१

७        भिवंडी निजामपूर मनपा ७

८        मीरा भाईंदर मनपा        १३८

९        पालघर ३२६

१०      वसईविरार मनपा         २०१

११      रायगड ४६६

१२      पनवेल मनपा    १४४

ठाणे मंडळ एकूण        ३२६५

१३      नाशिक ६७९

१४      नाशिक मनपा   ३५५

१५      मालेगाव मनपा १८

१६      अहमदनगर      १४०६

१७      अहमदनगर मनपा        १०१

१८      धुळे     ४१

१९      धुळे मनपा       १७

२०      जळगाव          ११२

२१      जळगाव मनपा  २९

२२      नंदूरबार ४०

नाशिक मंडळ एकूण     २७९८

२३      पुणे      १२८७

२४      पुणे मनपा        ६३७

२५      पिंपरी चिंचवड मनपा    ३८५

२६      सोलापूर          ९३१

२७      सोलापूर मनपा  ४७

२८      सातारा २५६१

पुणे मंडळ एकूण         ५८४८

२९      कोल्हापूर        १३२६

३०      कोल्हापूर मनपा ५५४

३१      सांगली ११६७

३२      सांगली मिरज कुपवाड मनपा    १६०

३३      सिंधुदुर्ग ५१२

३४      रत्नागिरी         ४३७

कोल्हापूर मंडळ एकूण  ४१५६

३५      औरंगाबाद       २६६

३६      औरंगाबाद मनपा         १२१

३७      जालना १००

३८      हिंगोली ४७

३९      परभणी १६१

४०      परभणी मनपा   ६४

औरंगाबाद मंडळ एकूण ७५९

४१      लातूर   १५५

४२      लातूर मनपा     २८

४३      उस्मानाबाद     ४५६

४४      बीड     ५९६

४५      नांदेड   ४४

४६      नांदेड मनपा     ३६

लातूर मंडळ एकूण       १३१५

४७      अकोला          २१७

४८      अकोला मनपा  १४८

४९      अमरावती       ४१२

५०      अमरावती मनपा  ९५

५१      यवतमाळ        ३६५

५२      बुलढाणा         ५५९

५३      वाशिम ३१५

अकोला मंडळ एकूण   २१११

५४      नागपूर  १८८

५५      नागपूर मनपा    २६३

५६      वर्धा     १६४

५७      भंडारा  ६५

५८      गोंदिया ४७

५९      चंद्रपूर   १६३

६०      चंद्रपूर मनपा     ५४

६१      गडचिरोली      ७७

नागपूर एकूण    १०२१

 



हेही वाचा -

नवी मुंबई पालिका १११ प्रभागांत लसीकरण केंद्रे उभारणार

वृक्ष छाटणीची परवानगी अॅपवरून मिळणार, महापालिकेचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा