राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन २१७१ रुग्ण आढळले आहेत. तर २५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १९ लाख २० हजार ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या ४३ हजार ३९३ सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९५.२६ टक्के झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र त्याचवेळी कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मंगळवारी २२०४ रुग्ण आढळले होते.
राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा ५० हजार ८९४ इतका झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४३,६७,०९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१५,५२४ (१४.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,००,१५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक नियमांनाही शिथिलता देण्यात आली आहे. लवकरच लोकलही सुरु होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णातील वाढ मंदावली असून आपण घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोनावर आळा घालण्यास मदत झाली आहे.
खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता
प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय