Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी २२२ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (३ ऑक्टोबर) २२२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १२९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी २२२ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (३ ऑक्टोबर) २२२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १२९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसंच ११ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ४, नवीन पनवेलमधील ३, कळंबोलीतील २ तसेच पनवेेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १८, नवीन पनवेल २१, खांदा काॅलनी ९, कळंबोली ४५, कामोठे ७३, खारघर ५२, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १५,   नवीन पनवेल ३५, कळंबोली २५, कामोठे २०, खारघर ३२,  तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे.  

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १९९७३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १७६१२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४४७ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १९१४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा- 

एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार

तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा