Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी २२९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २१ सप्टेंबर) २२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी २२९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ( २१ सप्टेंबर) २२९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २१४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. तसंच नवीन पनवेलमधील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ५२, नवीन पनवेलमधील २८, खांदा कॉलनीतील १७, कळंबोली-रोडपाली येथील ३०,  कामोठ्यातील ३७, खारघरमधील ६१, तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ४०,  नवीन पनवेलमधील २५, कळंबोली-रोडपाली येथील ३३, कामोठ्यातील ५७, खारघरमधील ५६,  तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १६६९२ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १४१९२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१२९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू 
मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा