Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१२ जानेवारी) २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी २३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (१२ जानेवारी) २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून त्यामध्ये नवीन पनवेल, कामोठे आणि खारघर येथील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ७,  खांदा काॅलनी १, कळंबोली ४, कामोठे ४, खारघर  येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १४,  कळंबोली १०, कामोठे १३, खारघर येथील १२ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८०३८ कोरोना रूग्णांपैकी २७०४४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४०७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूचRead this story in English or हिंदी
संबंधित विषय