Advertisement

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत २३ रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करीत असताना आता म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढ होत असल्याने महापालिकेच्या तीन रुग्णालयांत यावर उपचार पद्धती सुरू केल्या आहेत

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत २३ रुग्ण
SHARES

नवी मुंबईतही आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहे. आतापर्यंत येथे म्युकरमायकोसिसचे २३ रुग्ण आढळले आहेत.  नवी मुंबई मागील आठवड्यात म्युकरमायकोसिसचे अवघे ७ रुग्ण होते. 

म्युकरमायकोसिसच्या २३ रुग्णांपैकी १९ रुग्णांवर खासगी रुग्णालयात तर  ४ रुग्णांवर महापालिका रुग्णालयांत  उपचार सुरू आहेत. यातील ३५ टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. 

मुंबई, ठाणेतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले आहेत. आता नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करीत असताना आता म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढ होत असल्याने महापालिकेच्या तीन रुग्णालयांत यावर उपचार पद्धती सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांची पथके बनविण्यात आली आहे.

 दरम्यान,  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांत म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांसाठी बाह्य रुग्ण सेवा कक्ष (OPD) त्वरीत सुरु करण्याचे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले आहेत. एखाद्या व्यक्तीस हा आजार झाल्याचे आढळल्यास त्या रुग्णावर वाशीच्या महापालिका सार्वजनिक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. तसंच  त्याबाबतची पूरक औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा