Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २३३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) २३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर २३८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी २३३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) २३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर २३८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसंच ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २२, नवीन पनवेलमधील ४९, खांदा काॅलनीतील १३, कळंबोली-रोडपाली येथील १६,  कामोठ्यातील ६५, खारघरमधील ६१, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ७७,  नवीन पनवेलमधील २७, कळंबोली-रोडपाली येथील १४, कामोठ्यातील ५३, खारघरमधील ५३,  तळोजा येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १७६५६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १५१४३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३९९ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २११४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपयेRead this story in हिंदी
संबंधित विषय