Advertisement

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर

सोमवार ३ मे रोजी देखील कोरोनाबाधितांची संख्या ही ३ हजारांच्या खालीच नोंदवण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत २६६२ इतक्या नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईतील (mumbai) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. सोमवार ३ मे रोजी देखील कोरोनाबाधितांची संख्या ही ३ हजारांच्या खालीच नोंदवण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत २६६२ इतक्या नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील २४ तासांमध्ये २६६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण नोंदवण्यात आले. तर ५७४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. मुंबईत सध्याच्या घडीला एकूण ५४१४३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ६५८८६६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५८९६१९ रुण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ इतका आहे. तर मुंबईत सोमवारी एकूण ७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईत १३४०८ इतके कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.

हेही वाचा- मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती

मुंबईत कोविड वाढीचा दर (२६ एप्रिल-२ मे)- ०.६१% इतका होता. तर रुग्ण दुपटीचा दर १०३ दिवसांवर होता. मात्र सोमवारी रुग्ण दुपटीचा दर आणखी वाढून १११ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी मुंबईतील कोरोना संसर्गावर अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षांनुसार मुंबईमध्ये महिन्याभरात २० लाख नागरिकांचं लसीकरण झालं, कुठलाही नवा स्ट्रेन आला नाही आणि लसीकरण सुरळीत सुरू राहिलं तर जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील, असं नमूद करण्यात आलं आहे.

सद्यस्थितीत महापालिकेकडून मुंबईतील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध होत असला, तरी महापालिका नियोजन करून काही निवडक केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील खासकरून लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं लसीकरण करत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा