Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २७३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२३ सप्टेंबर) २७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २७३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२३ सप्टेंबर) २७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर १० मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कामोठ्यातील ३, खारघरमधील २ तसेच पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, तळोजा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४९, नवीन पनवेलमधील ६०, कळंबोली-रोडपाली येथील ३२,  कामोठ्यातील ६३, खारघरमधील ६८, तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ४६,  नवीन पनवेलमधील ४२, कळंबोली-रोडपाली येथील २८, कामोठ्यातील ६३, खारघरमधील ३८,  तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १७१५९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १४६१९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१५० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा

ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारणसंबंधित विषय
Advertisement