Advertisement

सप्टेंबर महिन्यात विक्रमी लसीकरणाची नोंद

सप्टेंबर २०२१ या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात विक्रमी लसीकरणाची नोंद
SHARES

सप्टेंबर २०२१ या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे १० लाख लशींचा सरासरी साठा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे १९ लाख २५ हजार १४० लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीनं लसीकरणाला वेग देण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून १६ जानेवारी २०२१ ते आज ३० सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-19 प्रतिबंधक लशीच्या १ कोटी २३ लाख ११ हजार ५४१ इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण ७७ लाख ६२ हजार ४७० लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर ७६ लाख ९६ हजार ८३३ एवढ्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेला वेग देताना महानगरपालिकेनं विविध समाज घटकांचा देखील विचार करुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभं रहावं लागू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण, अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, विदेशात शिक्षण अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेनं केल्या आहेत.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' ३ वॉर्डमध्ये १०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

मुंबईत २ डोसनंतरही एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा