Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २९४ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (१२ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २९४ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन २९४ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (१२ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २९४ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४०,६३९ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ४७, नेरुळ ५२, वाशी ३०, तुर्भे ३२, कोपरखैरणे ३३, घणसोली ४१, ऐरोली ५१, दिघामध्ये ८  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५७, नेरुळ ४२, वाशी २८, तुर्भे ४६, कोपरखैरणे १३,  घणसोली ३५, ऐरोली ३८, दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६,४०६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८२३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८९ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -  

खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा