Advertisement

धारावीत आढळले कोरोनाचे ३ रुग्ण

धारावीकरांनी कोरोनाला हरवलं असून, धारावीत केवळ ३ नवीन रुग्णाची नोंद झाली आहे.

धारावीत आढळले कोरोनाचे ३ रुग्ण
SHARES

मुंबईसह राज्यभरात (maharashtra) गतवर्षी कोरोनानं शिरकाव केला. त्यावेळी मुंबईतील धारावी परिसर हा कोरोनाचा (coronavirus) हॉटस्पॉट ठरला होता. धारावीतील अनेकांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांनी सुखरूप मात केली होती. मात्र, कालांतरानं महापालिकेनं 'धारावी पॅटर्न' (dharavi) राबवत धारावीतील रुग्ण संख्या आटोक्यात आणली. शिवाय, त्यानंतर धारावीकरांनी सुटकेचा निश्वास ही सोडला. मात्र विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं नागरिकांना कोरोनाची बाधा होत होती. परंतु, यावेळीही धारावीकरांनी कोरोनाला हरवलं असून, धारावीत केवळ ३ नवीन रुग्णाची नोंद झाली आहे.

जगाचे लक्ष वेधून राहिलेल्या धारावीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासकीय आणि सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असून, याच प्रयत्नांना उल्लेखनीय यश येत आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कधी शून्य, तर कधी २-१च्या आसपास आढळून येत असून, रविवारी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

मुंबई महापालिकेकडून धारावीत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे काम केले जात आहे. यासाठी येथील नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. नागरिकांना सातत्यानं आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यास उल्लेखनीय यश येत असून, कोरोना रुग्णांची संख्या शून्य ते ३च्या घरात आढळून येत आहे.

रविवारी धारावीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. येथे आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ९१६ आहे. दादरमध्ये १५ रुग्ण आढळून आले. इथं आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५६ आहे. माहिम इथं कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आले. येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० हजार ८४ आहे. दरम्यान, इथं कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून विविध स्तरावर काम केले जात असून, लसीकरणाचा वेगदेखील वाढविला जात आहे.

रुग्णसंख्या

ठिकाण
पॉझिटिव्ह रुग्ण
सक्रिय रुग्ण
डिस्चार्ज
दादर
९७५६
१२६
९४४६
धारावी
६९१६
२१
६५३६
माहिम
१००८४
७९
९८०३
एकूण
२६७५६
२२६
२५७८५

 


हेही वाचा -

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा