Advertisement

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी आढळले कोरोनाचे ३० रुग्ण

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ३० नवीन रुग्ण आढळले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी आढळले कोरोनाचे ३० रुग्ण
SHARES

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी COVID 19 चे ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)च्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे मंगळवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी एमबीएमसीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. सरकार त्यापासून बचाव करण्यात गुंतलेलं असलं तरी, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाचला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २३ हजार ४२३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे  आतापर्यंत ७४६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मंगळवारी, मीरा-भाईंदरमध्ये ३० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २३ हजार ४२३ वर पोहचला आहे. तसंच या आजारानं मृतांचा आकडा ७४६ वर पोहोचला आहे. मंगळवारी, ५५ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानुसार बरे झालेल्या रुग्णांचा आकडा २२ हजार १४९ च्या घरात गेला आहे.

मीरा भाईंदर या भागात कोरोना रुग्णांचा आकडा विभागल्यास बुधवारी भाईंदर पूर्वेतील ६, भाईंदर पश्चिममधील १४ आणि मीरा रोडमधील ५ रुग्ण नोंदवण्यात आली आहेत.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा