Advertisement

राज्यात रविवारी ३० हजार नवीन रुग्णांची नोंद

रविवारी ११ हजार ३१४ करोनातून बरे झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात रविवारी ३० हजार नवीन रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात ३० हजार ५३५ नवीन रुग्ण आढळले. तर ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे. 

आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. रविवारी ११  हजार ३१४ करोनातून बरे झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ टक्के एवढे झाले आहे.राज्यात सध्या २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

देशात रविवारी ४६ हजार ९५१ रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरनंतरची ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख ४६ हजार ८१ इतकी झाली आहे.

रविवारी  २१२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून २१ हजार १८० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत उपचारानंतर बरं झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी ११ लाख इतकी आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार ९७ इतकी आहे.



हेही वाचा -

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन

  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा