Advertisement

कल्याण डोंबिवलीत ३३८ नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३८८ रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ३३८ नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३८८ रुग्ण आढळले.  तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,७५० झाली आहे. यामध्ये ४६७२ रुग्ण उपचार घेत असून ३५,२७७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३३८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३६, कल्याण प १०४, डोंबिवली पूर्व ११९, डोंबिवली प ६७, मांडा टिटवाळा १०, मोहना १, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपयेRead this story in हिंदी
संबंधित विषय