Advertisement

भायखळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जीसह ३९ महिला कैदी कोरोनाबाधित

राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होत नाही. त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे.

भायखळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जीसह ३९ महिला कैदी कोरोनाबाधित
SHARES

भायखळा तुरुंगातही आता कोरोनाचा कहर झाल्याचं समोर आलं आहे. भायखळा येथील महिला तुरुंगात शिना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्यासह ३९ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

भायखळा महिला तुरुंगातील ३५० कैद्यांची दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३९ महिला कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात इंद्राणी मुखर्जी हिचा देखील समावेश आहे. या सर्वांना भायखळा येथील शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड आणि विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. आर्थर रोड तुरुंगातील २२ कैद्यांनाही या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

राज्यातील ४७ तुरुंगांमध्ये सध्या २५९ कैदी आणि १०४ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाबाधित आहेत. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होत नाही. त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे.

 राज्यातील सर्व तुरुंगांत  आतापर्यंत ५९,०३६ कैद्यांच्या चाचण्या केल्या आहेत. यामध्ये ३२६२ कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ९ कैद्यांचा मृत्यू झाला असून २५९ कैदी  वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जवळपास ३,९८२ कर्मचारी आणि अधिकारी बाधित झाले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०४ सध्या उपचार घेत आहेत.



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा