Advertisement

मुंबईत कुष्ठरोगाचे आणखी ४१ रुग्ण; १६ हजार संशयीत

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेनं घरोघरी भेट देऊन कुष्ठरुग्णांची शोध मोहीम २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळात मुंबई शहरात राबविली होती. यात ४७ लाख लोकसंख्येपैकी २८ लाख लोकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या प्रत्यक्ष तपासणीमध्ये १६ हजार संशयीत रुग्ण आढळले असून त्यातील ४१ रुग्णांना कुष्ठरोगाची लागण झाली आहे.

मुंबईत कुष्ठरोगाचे आणखी ४१ रुग्ण; १६ हजार संशयीत
SHARES

मुंबई महानगरपालिकेने २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळात राबविलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये ४१ नवे रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेतंर्गत मुंबई शहरातील तब्बल ९१ टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये १६ हजार संशयीत रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यातील ४१ जणांना कुष्ठरोगाची लागण झाली असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.


२८ लाख लोकांची तपासणी

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेनं घरोघरी भेट देऊन कुष्ठरुग्णांची शोध मोहीम २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळात मुंबई शहरात राबविली होती. यात ४७ लाख लोकसंख्येपैकी  २८ लाख लोकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या प्रत्यक्ष तपासणीमध्ये १६ हजार संशयीत रुग्ण आढळले असून त्यातील ४१ रुग्णांना कुष्ठरोगाची लागण झाली आहे. अातापर्यंत फक्त ६० टक्के संशयित रुग्णांच्या चाचण्या पार पडल्या असून ४० टक्के रुग्ण अद्याप बाकी आहेत. त्यामुळं येत्या काही दिवसात या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत एप्रिल ते सप्टेंबर २०१८ काळात राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये १९५ नवे रुग्ण आढळले होते.


वांद्रेत सर्वाधिक रुग्ण 

या मोहिमेमध्ये वांद्रे भागामध्ये सर्वाधिक १ हजार २२८ संशयित रुग्ण आढळलं असून त्याखालोखाल १ हजार ३८६ रुग्ण चेंबूर परिसरात आढळले आहे. तसंच परेल मध्येही ७९७ रुग्ण आढळले आहेत. तपासणी केलेल्या संशयीत रुग्णापैकी केवळ ७ हजार ००९ (४४ टक्के) रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यानंतर आरोग्य केंद्रावर डॉक्टरांनी केलेल्या तपासणी ४१ नवे रुग्ण आढळले असून यातील १५ रुग्ण हे बहुजीवाणू (मल्टीबॅसिलरी) आणि १३ रुग्ण अल्पजीवाणूचे (पॉसिबॅसेलरी) आहेत. तसंच या रुग्णांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे.


 या शोध मोहिमेमध्ये एक स्वयंसेवक आणि एक विद्यार्थी असे २७०० गट सहभागी झाले होते. या प्रत्येक गटानं दरदिवशी २५ घरांचं सर्वेक्षण केलं. संशयीत रुग्णापैकी अद्याप ४० टक्के संशयीत रुग्णांची डॉक्टरांमार्फत तपासणी न झाल्यानं येत्या काळात त्यांच्या घरी जाऊन डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

- डॉ. राजू जोटकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग विभाग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा