Advertisement

117 गोविंदा जखमी, दोघांचा मृत्यू


117 गोविंदा जखमी, दोघांचा मृत्यू
SHARES

दहीहंडी म्हटलं की गोविंदांचा जल्लोष, थरांचा थरार आणि हंडी फोडण्याची स्पर्धा या गोष्टींचा बोलबाला असतो. मात्र या गोष्टींसोबतच दहीहंडीमध्ये जखमी होणाऱ्या गोविंदांचाही आकडा मोठा असतो. याही वर्षी तब्बल 117 गोविंदा जखमी झाले असून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर दहीहंडीसाठी मानवी थर लावण्यावर मर्यादा घालण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनाकडून केली जात होती. तसे काही निर्बंध घालण्यातही आले होते. मात्र नंतर पुन्हा मंडळांच्या आग्रही मागण्या मान्य करत हे निर्बंध हटवण्यात आले. मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचं चित्र यावेळी निर्माण झालं नाही. कारण यंदाच्या वर्षीही अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.


जखमी गोविंदा आणि रुग्णालय  

जी.टी. रुग्णालय – 1
सेंट जॉर्ज रुग्णालय – 7
लोकमान्य टिळक रुग्णालय(सायन) – 15
केईएम रुग्णालय – 21
नायर रुग्णालय – 12
जे. जे. रुग्णालय - 1
महात्मा फुले रुग्णालय (विक्रोळी) – 1
राजावाडी रुग्णालय - 7
अग्रवाल रुग्णालय (मुलुंड) – 7
व्ही. एन. देसाई रुग्णालय – 7
कूपर रुग्णालय – 10
डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली) – 4
एस. के. पाटील (कांदिवली) - 3
ट्रॉमा केअर (गोरेगाव) – 3
शताब्दी रुग्णालय (गोवंडी) – 7
भाभा रुग्णालय (कुर्ला) – 1
भाभा रुग्णालय (वांद्रे) – 5
मॉ रुग्णालय – 2
सिद्धार्थ रुग्णालय – 3

यापैकी 7 जणांना रुग्णालयात अजूनही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. त्यातील केईएममध्ये 1, नायरमध्ये 1, सिद्धार्थमध्ये 1, जी.टी.मध्ये 1 आणि सायनमध्ये तिघांना ठेवण्यात आले आहे.


शॉक लागून गोविंदाचा मृत्यू

नवी मुंबईतील ऐरोली येथे शॉक लागून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या दहीहंडीमध्ये हा अपघात घडला. जयेश सरले (30) असं या गोविंदाचं नाव आहे. चुनाभट्टीतील प्रेमनगर गोविंदा पथकाचा तो गोविंदा होता. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानुसर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले या दहीहंडीचे आयोजक आहेत.


दहीहंडी फोडताना खाली पडून मृत्यू

पालघर जिल्ह्यातील काशीपाडा येथे दहीहंडी फोडताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. रोहन किणी (21) असे त्या तरुणाचे नाव असून हा तरुण दहीहंडी फोडताना खाली पडल्याने जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  

बालगोविंदांची वयोमर्यादा 18 वरुन 14 वर

यावर्षी निर्बंधांच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी सण जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली होती. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून 18 वरून 14 केले आहे. मात्र याशिवाय थरांची संख्या किती असावी असे काही निर्बंध न्यायालयाने हटवले होते. त्यामुळे एकीकडे गोविंदा पथकांचा उत्साह तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणेची कसरत असे चित्र मुंबईत दिसत होते.


पोलिसांचे सुरक्षा कवच

मुंबई पोलीस दलातील 35 हजार अधिकारी आणि जवान शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आले होते. केंद्रीय आणि राज्य राखीव बलाच्या 15 तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दलही कोणत्याही अनुचित प्रकारासाठी सज्ज होते. ड्रोनसह 5 हजार सीसीटीव्हींची नजर संपूर्ण मुंबईवर होती.



हेही वाचा

दहीहंडीच्या नादात 'त्यांचे' नशीबच फुटले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा