Advertisement

मुंबईतील 5 प्रमुख दहीहंडी


मुंबईतील 5 प्रमुख दहीहंडी
SHARES

मुंबईत प्रत्येक सण मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. मग तो गणपती असो किंवा नवरात्री. या सार्वजनिक उत्सवाप्रमाणेच गोकुळाष्टमीचा उत्साहही तेवढ्याच थाटात दरवर्षी साजरा केला जातो. गोकुळाष्टमी येणार म्हटल्यावर या उत्साहाच्या अवघ्या आठवड्याभरापासूनच बाळगोपाळांची हंडी फोडण्याची तयारी जोमाने सुरू होते. मग दहीहंडीच्या दिवशी थर लावण्याची जणू काही स्पर्धाच सुरू असते. प्रत्येक ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते.


पण वरळीतील संकल्प प्रतिष्ठान, बोरिवलीतल्या मागाठाणेतील मंडळाची दहीहंडी आणि घाटकोपरमध्ये भाजपाचे आमदार राम कदम यांच्या मंडळाची दहीहंडी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. याचसोबत ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठान आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी कलाकार मंडळींची दरवर्षी उपस्थिती असते. मग या ठिकाणी दहीहंडी पाहण्याची मजाच वेगळी असते.


संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी, जांबोरी मैदान, वरळी

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मंडळाची दहीहंडी मुंबईतील प्रतिष्ठित दहीहंडीपैकी एक समजली जाते. या मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी बॉलिवूड कलाकारही हजेरी लावतात.


राम कदम दहीहंडी, सॅनेटरी लेन घाटकोपर

भाजपाचे आमदार राम कदम यांच्या मंडळाची दहीहंडीही प्रसिद्ध आहे. मागील अनेक वर्षांपासून घाटकोपरमध्ये दहीहंडी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये सर्वात जास्त थर लावून हंडी फोडण्याऱ्यांना बक्षिसही दिले जाते. घाटकोपरच्या या मंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून गोविंदा येतात.


मागाठाणे दहीहांडी, बोरिवली

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे दरवर्षी मागाठाणे येथे दहीहंडीचे आयोजन करतात. या कार्यक्रमातून मिळालेले पैसे ते गरीबांना दान करतात.


संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मंडळाची दहीहंडी सर्वात महागडी समजली जाते. या मंडळाच्या हंडीला सलामी देणाऱ्या गोपाळांना पुरस्काराच्या स्वरुपात पैसे आणि सोन्याची नाणी दिली जातात.


संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान मंडळाची दहीहंडी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या मंडळाची दहीहंडी पहाण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते.हेही वाचा - 

पुन्हा थरांचा थरार! दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटले

विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement