विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!


 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
 • विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!
SHARE

गोविंदा आला रेsss..आला! दहिहंडीचा उत्सव म्हणजे तरुणाईसाठी प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि आवेशाची पर्वणी! दहिहंडीच्या दिवशी बेभान होऊन नाचणारी आणि थरावर थर चढवणारी तरुणाई हे दृश्य मुंबईत दरवर्षी दिसतं. पण अर्थात, या सर्व जोशपूर्ण वातावरणात थरावर थर लावणारी तरुणाई स्वत:चीही पूरेपूर काळजी घेत असते.

मुंबईत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते. मोठमोठी मंडळं दहीहंडीचे थरावर थर लावून उपस्थितांची उत्कंठा शिगेला पोहोचवत असतात. आणि या सर्वांमध्ये एक नाव जवळपास प्रत्येक मुंबईकराच्या तोंडी असतं. ते नाव म्हणजे उपनगरचा राजा अर्थात जय जवान गोविंदा पथक!


कबड्डीपासून झाली सुरुवात...

मुंबईतील सर्वात प्रसिध्द आणि जास्त थर लावणारं गोविंदा पथक म्हणून या मंडळाची ख्याती आहे. 2000 साली जय जवान गोविंदा पथकाने दहीहंडीसाठी थर लावायला सुरुवात केली. जोगेश्वरीच्या शिवटेकडी भागात हे गोविंदा थर लावायचा सराव करतात. सुरुवातीच्या काळात या पथकाचे गोविंदा 'स्वामी समर्थ क्लब'मधून कबड्डी खेळायचे.

या 'स्वामी समर्थ क्लब'चे प्रशिक्षक संदीप धावले यांच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना होती. या मुलांच्या फिटनेसचा उपयोग दहीहंडीचे थर लावण्यासाठी करण्याचा विचार त्यांनी केला. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 2000 साली 7 थर लावले. सध्या या पथकात 4 ते 5 हजार गोविंदांचा सहभाग आहे. 2012 साली 'जय जवान' पथकाने थेट स्पेनच्या 'कॅस्टेलर' प्रकारातला वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलं!


'कॅस्टेलर'चा विक्रम मोडीत

2012 साली 'जय जवान' पथकाने 'कॅस्टेलर'चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून भारताचे आणि पर्यायाने मुंबईचे नाव जागतिक पटलावर प्रसिद्ध केले. याआधी स्पेनमधील एका पथकाने 'कॅस्टेलर'साठी 39.27 फूट उंचीचा मानवी मनोरा रचून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र 'जय जवान' पथकाने 2012च्या दहीहंडीमध्ये तब्बल 43.79 फूट उंचीचा मानवी मनोरा रचून हा विक्रम मोडून काढला. याच पद्धतीने 2004मध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांच्या दहीहंडीमध्ये सर्वाधिक थर रचण्याचा विक्रम या पथकाने आपल्या नावावर करत लिमका बुकमध्येही स्थान मिळवलं होतं.


'कॅस्टेलर' म्हणजे काय?

'कॅस्टेलर' नावाचा एक खेळाचा प्रकार असून तो स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. स्पेनमधल्या अनेक उत्सवांमध्ये मानवी मनोरे रचण्याचा हा खेळ खेळला जातो. याच्या अनेक स्पर्धाही तिथे भरवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर युनेस्कोने मानवी संस्कृतीची जपणूक करणारा महत्त्वाचा खेळ म्हणून 'कॅस्टेलर'ला मान्यता दिलेली आहे.


वाद आणि न्यायालयीन सुनावणी

एकीकडे प्रचंड उत्साहात हे गोविंदा दहीहंडीसाठी सराव करत असताना दुसरीकडे गोविंदासाठी वयोमर्यादा 12 असावी की 18? थरांची उंची 20 फुटांपर्यंतच मर्यादित कशी ठेवावी? अशा अनेक मुद्द्यांवरुन सध्या वाद सुरु आहे. यावर न्यायालयामध्ये सुनावणीही सुरु आहे. मात्र 'गोविंदांनी योग्य आणि पुरेसा सराव केला, तर कोणतीही दुर्घटना होणार नाही' असा विश्वास 'जय जवान' पथकाचे प्रशिक्षक संदीप धावले यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय अनेक सामाजिक कार्यामध्येही मंडळाचा सहभाग असतो. महाड पूल दुर्घटना, 26 जुलैचा मुंबईतला पाऊस, गणपती विसर्जनावेळी पालिका कर्मचाऱ्यांना मदत अशी कामे मंडळाकडून केली जातात.


कसा असतो 'जय जवान'चा सराव

 • दोन महीने आधीपासून सराव
 • दररोज दोन तास सराव
 • सराव करण्याआधी वर्कआउट
 • व्यायामावर अधिक भर
 • जास्त वेळ थर उभे राहण्यासाठी क्षमता वाढवणेहेही वाचा

सविनय 'हंडी'भंग


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या