Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४७० नवीन कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी नवीन ४७० कोरोना रुग्ण आढळले. येथील कोरोना रुग्णांची संख्या ३८ हजारांच्या वर गेली आहे.

कल्याण डोंबिवलीत ४७० नवीन कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी नवीन ४७० कोरोना रुग्ण आढळले. येथील कोरोना रुग्णांची संख्या ३८ हजारांच्या वर गेली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवीन ४७० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३८,३०१ झाली आहे. यामध्ये ५४५१ रुग्ण उपचार घेत असून ३२,०८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४७० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५५, कल्याण प ११२, डोंबिवली पूर्व २०५, डोंबिवली प ७५, मांडा टिटवाळा १७, मोहना ५, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १० रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम
संबंधित विषय