Advertisement

नवी मुंबईत एपीएमसीत सर्वाधिक 495 रुग्ण

नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 1321 वर पोहोचला आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण हे एपीएमसी मार्केटमधील आहेत.

नवी मुंबईत एपीएमसीत सर्वाधिक 495 रुग्ण
SHARES

नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 1321 वर पोहोचला आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण हे एपीएमसी मार्केटमधील आहेत. एपीएमसीमध्ये आतापर्यंत 495 कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

आठवडाभर बंद असलेली एपीएमसी बाजारपेठ सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे धान्य आणि मसाला मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  नवी मुंबई महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमधील जवळपास 6 हजार व्यापारी, माथाडी कामगारांसह एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. यामधील 495 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

एपीएमसी मार्केटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 20 रुग्ण असलेल्या नवी मुंबईत दीड महिन्यात 1000 वर रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे एपीएमसीतील आहेत. तर इतर रुग्ण हे कोपरखैराणे, तुर्भे, घणसोली, नेरुळ या भागातील आहेत.चार दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकानेही एपीएमसी मार्केटमध्ये तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी वाढते रुग्ण पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. या पथकाने आतापर्यंत तीन वेळा नवी मुंबईला भेट दिली आहे.

नवी मुंबईतील कोरोना रिपोर्ट

  • कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या- 8867
  • कोरोना पॉझिटिव्ह – 1321
  • निगेटिव्ह – 6762
  • प्रलंबित- 784
  • वाशी येथील कोरोना केअर येथील नागरिक संख्या – 96
  • इंडियाबुल्समधील कोरोना केअर नागरिक संख्या- 120
  • घरातच क्वारंटाईन असलेल्या व्यक्ती- 9870
  • वाशी येथील कोव्हीड 19 विशेष रुग्णालयात येथे दाखल- 54
  • कोरोनामुळे मृत्यूची संख्या- 39
  • कंटेन्मेंट क्षेत्र-109

हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा