अमन बनण्यासाठी बीडवरून रूक्सार मुंबईत दाखल

मुलगी म्हणून वाढलेली ललिता साळवे लिंग दुरूस्ती शस्त्रक्रियेनंतर ललित झाला. तशीच शस्त्रक्रिया रूक्सारची होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर रूक्सारचं नाव काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. ही उत्सुकता तिच्या पालकांनी संपवली असून रूक्सार शस्त्रक्रियेनंतर अमन नावानं ओळखली जाणार आहे.

SHARE

ललित साळवेनंतर मुंबईच्या सेंट जाॅर्ज रूग्णालयात दुसरी लिंग दुरूस्ती शस्त्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. दुसरी शस्त्रक्रिया ५ वर्षांच्या चिमुकलीवर होणार आहे. ही चिमुकली बीडवरून गुरूवारी मुंबईत दाखल झाली आहे. या चिमुकलीचं नाव आहे रूक्सार शेख. गुरूवारी रूक्सार रूग्णालयात दाखल झाली असून तिच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या, तपासण्या करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तिच्यावरील शस्त्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सेंट जाॅर्ज रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


लवकरच शस्त्रक्रिया

मुलगी म्हणून वाढलेली ललिता साळवे लिंग दुरूस्ती शस्त्रक्रियेनंतर ललित झाला. तशीच शस्त्रक्रिया रूक्सारची होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर रूक्सारचं नाव काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. ही उत्सुकता तिच्या पालकांनी संपवली असून रूक्सार शस्त्रक्रियेनंतर अमन नावानं ओळखली जाणार आहे.


दाम्पत्यासमोरचा पेच

५ वर्षांपूर्वी माजलगावातील शेख दाम्पत्याला मुलगी झाली, या मुलीला त्यांनी अत्यंत लाडात वाढवलं. पण काही वर्षानंतर ज्या मुलीला आपण मुलगी म्हणून वाढवत आहोत, ती नक्की मुलगीच आहे का? असा प्रश्न या दाम्पत्याला पडला. हळूहळू रूक्सार मुलगी नाही याची खात्री होत गेली आणि तसं त्यांची चिंताही वाढत गेली.


ललितची मदत

अशातच ललित प्रकरणाची माहिती मिळाल्यावर या पालकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी त्वरीत ललितशी संपर्क साधत रूक्सारबद्दलची माहिती देत सेंट जाॅर्ज रूग्णालयाकडे मोर्चा वळवला. डाॅक्टरांच्या मार्गदर्शनानुसार रूक्सारची लिंग दुरूस्ती शस्त्रक्रिया करण्याचा पालकांनी निर्णय घेतला. त्यानुसार या शस्त्रक्रियेसाठी गुरूवारी रूक्सार आपल्या पालकांसह सेंट जाॅर्ज रूग्णालयात दाखल झाली.


चाचण्या झाल्या

गुरूवारी सोनोग्राफीसह अन्य चाचण्या झाल्या असून येत्या ३-४ दिवसांत रूक्सारवर लिंग दुरूस्ती शस्त्रक्रिया पार पडेल, असं डाॅ. गायकवाड यांनी सांगितलं आहे. तर ललितची शस्त्रक्रिया करणारे डाॅ. रजत कपूर हेच रूक्सारवरही शस्त्रक्रिया करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता लवकरच रूक्सार अमन बनणार अाहे.हेही वाचा-

त्या' पाच वर्षांच्या चिमुकलीवर आठवड्याभरात लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया

५ वर्षांच्या 'ती'लाही बनायचयं 'तो'संबंधित विषय
ताज्या बातम्या