Advertisement

मुंबईत बुधवारी ५३०० रुग्ण बरे

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या घटत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

मुंबईत बुधवारी ५३०० रुग्ण बरे
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या घटत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. बुधवारी मुंबईत ४ हजार ९६६ नवीन रुग्ण आढळले  तर ७८ रूग्णांचा मृत्यू झाला. 

बुधवारी ५३०० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांचा एकूण आकडे ६४०५०७ झाला आहे. तर एकूण १२९९० मृत्यू झाले आहेत. याशिवाय  ५६०४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ५३४१६२५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी ३९१३५ चाचण्या करण्यात आल्या.

सध्या मुंबईत ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८७ टक्के इतका झाला आहे. तर डबलिंग रेट हा ७४ दिवसांवर गेला आहे. हेही वाचा 

सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्डचे दर कमी केले, आता इतक्या किंमतीत लस मिळणार

१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा