Advertisement

कल्याण डोंबिवलीत ५३६ नवीन कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कल्याण डोंबिवलीत ५३६ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. बुधवारी नवीन ५३६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३२,९२९ झाली आहे. यामध्ये ४३९० रुग्ण उपचार घेत असून २७,८४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७०, कल्याण प. १५४, डोंबिवली पूर्व १६७, डोंबिवली प ९०, मांडा टिटवाळा  ४२, तर मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ७३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा