Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ५४ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२१ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५४ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ५४ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२१ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५४ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ४२९ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ७, नेरुळ ५, वाशी १०, तुर्भे ५, कोपरखैरणे ८, घणसोली ३, ऐरोली येथील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर ७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर ११, नेरुळ ०, वाशी १३, तुर्भे १४, कोपरखैरणे १४,  घणसोली २, ऐरोली १८, दिघा येथील २ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,५२७ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

शनिवारी लसीकरण सुरू केल्यानंतर नवी मुंबईत प्रत्येक दिवशी ४०० जणांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. शनिवारी ३१३, मंगळवारी २३७ व बुधवारी ३६१ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा