Advertisement

राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक, साडेपाच हजार नव्या रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गुरूवारी राज्यात कोरोनाचे नवीन ५४२७ रुग्ण आढळले.

राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक, साडेपाच हजार नव्या रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गुरूवारी राज्यात कोरोनाचे नवीन ५४२७ रुग्ण आढळले. तर २५४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

गुरूवारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ८१ हजार ५२० झाली असून त्यापैकी १९ लाख ८७ हजार ८५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५१ हजार ६६९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता ४० हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यवतमाळ आणि अमरावतीत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. येत्या रविवारपासून संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये करोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून तर ती झपाट्याने होत आहे. अमरावतीत १४ फेब्रुवारी रोजी ४३५ रुग्ण सापडले आहेत. तर १५ फेब्रुवारीला ४३९ रुग्ण, १६ फेब्रुवारीला ४९५ रुग्ण आणि १७ फेब्रुवारी या दिवशी ४९८ रुग्ण आढळले. 



हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा