Advertisement

रुग्णवाढ चिंताजनकच, राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवे ५६ हजार रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार २४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

रुग्णवाढ चिंताजनकच, राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवे ५६ हजार रुग्ण
SHARES

राज्यात गुुरुवारी झालेली कोरोना रुग्णवाढ चिंताजनकच आहे. राज्यात ५६ हजार २८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के आहे. 

गुरूवारी ३६ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २६ लाख ४९ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५ टक्क्यांवर आले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार २४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८३ हजार ६९३, ठाणे जिल्ह्यात  ६९ हजार ९९३, नागपूर जिल्ह्यात ६१ हजार ७११ तर नाशिकमध्ये ३४ हजार ९१९ इतका आहे.

 औरंगाबादमध्ये १८ हजार ८२, अहमदनगरमध्ये १५ हजार २९२, नांदेडमध्ये ११ हजार ६५९,जळगावमध्ये ८ हजार २१२, रायगडमध्ये  ७ हजार ५६३,  अमरावतीत ३ हजार ८४७, कोल्हापुरात १ हजार ५६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८८५ इतकी आहे.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेची नवी गाइडलाइन; आता 'या' गोष्टींनाच परवानगी

आता खासगी ऑफिसातही मिळणार कोरोना लस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा