Advertisement

कल्याण-डोंबिवलीत ५७८ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रविवारी नवीन ५७८ कोरोना रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण-डोंबिवलीत ५७८ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रविवारी नवीन ५७८ कोरोना रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३४,६८६ झाली आहे. यामध्ये ५१३२ रुग्ण उपचार घेत असून २८,८३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १४८, कल्याण प. २०४, डोंबिवली पूर्व १०२, डोंबिवली प १०४, मांडा टिटवाळा १०, मोहना ९, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ११ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा

कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल

National School Of Drama च्या संचालकपदी परेश रावल यांची नियुक्ती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा