राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ५८ हजार ९९३ रुग्ण आढळले आहेत. तर ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ४५ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा ३२ लाख ८८ हजार ५४० वर गेला आहे. यापैकी २६ लाख ९५ हजार १४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५७ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात ५ लाख ३४ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत शुक्रवारी ९ हजार २०० रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण रुग्णांचा आकडा ५ लाख ८९८ वर गेला आहे. यापैकी ९० हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मुंबईत ५ हजार ९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कल्याण डोंबिवलीत २०१९ नवे रुग्ण आढळले असून ८८१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर ४ बाधितांच्या मृतांची नोंद आहे. सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३ हजार ५०३ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत ७६ हजार ९८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १८२५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर १०६५ रुग्ण बरे झाले आहेत असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे १४३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ७६ हजार २८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा -