Advertisement

धारावी, दादर, माहीममध्ये सोमवारी ५९ नवे रुग्ण

कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे.

धारावी, दादर, माहीममध्ये सोमवारी ५९ नवे रुग्ण
SHARES

कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे. सोमवारी धारावीमध्ये केवळ ११ नवीन रुग्ण सापडले आहेत. याशिवाय दादर आणि माहीमधील परिस्थितीही नियंत्रणात आहे. दादरमध्ये २८ तर माहीमध्ये  २० नवीन रुग्ण आढळले आहेत.

धारावी, दादर, माहीमचा समावेश असलेल्या जी नॉर्थ मधील एकूण रुग्णसंख्या ४५८२ इतकी झाली आहे. तर येथे १२९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. धारावीत सोमवारी ११ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २३३४ वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून मृतांचा आकडा ८१ इतकाच आहे. तर येथे सध्या ५०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दादरमध्ये ३९२ ऍक्टिव्ह तर माहीममध्ये ३९२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. या तीनही परिसरात मिळून सोमवारी ५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. येथील मृतांचा एकूण आकडा १११ इतका आहे. धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील दिलासादायक वाढ झाली आहे. आतापर्यंत दादर मध्ये एकूण ५६५, माहीम मध्ये एकूण ८४८ तर धारावीत १७३५ असे एकूण ३१४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.हेही वाचा- 

दिलासादायक! १०४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

Containment Zones List : 'हे' आहेत मुंबईतील कंटेन्मेंट झोनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा