Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (५ जानेवारी) कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (५ जानेवारी) कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ३७७ झाली आहे. 

मंगळवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १२, नेरुळ १३, वाशी ६, तुर्भे ६, कोपरखैरणे ५, घणसोली ४, ऐरोली १४, दिघा येथील येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर ६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १८, नेरुळ १५, वाशी ११, तुर्भे २, कोपरखैरणे ६,  ऐरोली ६,  दिघा येथील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,४०८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०६२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ९०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून दिवाळीनंतर वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात खंड पडू न देता डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात ८०,६२४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 

 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत एकूण ५१,००२ कोरोना रूग्ण आढळले असून त्यापैकी ४९,०६० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व १०५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे ९६.१९ % आणि मृत्यूदराचे २.०६ % हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत चांगले आहे.



हेही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा