Advertisement

राज्यातील ६४ पोलिसांना कोरोनाची लागण, ३४ पोलीस मुंबईतले

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने महाराष्ट्रातील ६४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळले आहेत.

राज्यातील ६४ पोलिसांना कोरोनाची लागण, ३४ पोलीस मुंबईतले
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने महाराष्ट्रातील ६४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

चिंता वाढली

पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवार २२ एप्रिल २०२० पर्यंत महाराष्ट्रातील ६४ पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनाग्रस्त (covid-19) झाले आहेत. यामध्ये १२ पोलीस कर्मचारी आणि ५२ पोलीस काॅन्स्टेबल यांचा समावेश आहे. या ६४ पोलिसांपैकी जवळपास निम्मे म्हणजे ३४ पोलीस अधिकारी/कर्मचारी हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतील पोलीस विभागाची (mumbai police department) चिंता देखील वाढली आहे. 

हेही वाचा- लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या ११७ घटना

बंदोबस्ताची जबाबदारी

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशभरात ३ मे २०२० पर्यंत लाॅकडाऊन (lockdown) लागू करण्यात आलं आहे. संचारबंदीच्या काळात लोकांनी गर्दी करू नये, रस्त्यावर उतरू नये याची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त (police bandobast) लावण्यात आला आहे. पोलीस दिवस-रात्र परिसरातून गस्त देखील घालत आहेत. शिवाय एखाद्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण वा संशयित आढळल्यास संबंधित परिसरातून कोरोनाग्रस्त वा संशयितांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाणे, संबंधित परिसर सील करणे आणि हाॅस्पिटल्स, क्लिनिक यांची सुरक्षा करण्याची करण्याची जबाबदारी देखील पोलिसांवरच टाकण्यात आली आहे. अशा सर्व परिस्थितीत अनवधानाने कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

याची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी पोलीस, पत्रकार मंडळी सुरक्षित राहिली पाहिजे, त्यासाठी कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेसह आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले आहेत. 

तसंच नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोना चा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा येत आहेत. पोलीस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताणही वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातंच थांबलं पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

हेही वाचा- मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

संबंधित विषय
Advertisement